शेतीशेती योजनासरकारी योजना

There is good news for the farmers, the condition of Sibil | शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सिबिलची अट

कर्ज माफी नंतर 25 ते 30 लाख शेतकऱ्यांचे सिबिल खराब.
नियमित कर्जदारांना प्रत्येक पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले पण 2017 ते 2022 या काळात कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील अंदाजीत 25 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांची बिल खराब झाले आहे सिबिलच्या अटीमुळे त्यातील अनेकांना बँकांकडून कर्ज मिळाले नाही

शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी सिबिलची अट रद्द.
पिक कर्जासाठी सिबिल ची अट नाहीच.
शेतकऱ्यांना भांडवलासाठी खाजगी सावकारांच्या दारात जायला लागू नये यासाठी पिक कार्यवाटपावेळी राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल अथवा सिबिल स्कोर चे बंधन घालू नये
रिझर्व बँकेच्या निर्देशात त्या संबंधित कोणतेही निर्बंध नाहीत

त्यामुळे राष्ट्रगीत बँकांना सिबिल स्कोरची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे असे पत्र सहकारी आयुक्त यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवले आहे दरवर्षी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामातील कार्यवाटप व शेतकरी कर्जदारांचे उद्दिष्ट ठरवले जाते. त्यानुसार दोन्ही हंगामात राज्यातील 38 ते 42 लाख शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटीहून अधिक कार्यवाटपाचे टार्गेट निश्चित केले होते. राष्ट्रीयीकृत बँकेच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँकांनाचे सर्वाधिक शेती कार्य वाटपाचे उद्दिष्ट असते पण मागील चार वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाचे दर गडबडले त्यामुळे बँकांची कार्य वसुली कमी झाली आहे त्यामुळे सहकारी बँक जिल्हा बँक अडचणीचा सामना करीत आहे तेथील शेतकऱ्यांना भांडवलासाठी राष्ट्रीयकृत बँकांचा आधार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका संबंधित शेतकऱ्यांचे सिबिल तसेच सिबील स्कोअर 600 ते 700 असल्याशिवाय पीक कर्ज देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा बँक सिबिल न पाहता शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटप करतात. या धर्तीवर राष्ट्रीय बँकांना देखील सिबिल ची अट बंधनकारक करता येणार नाही. असे सहकार आयुक्ताने आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे त्याची पालन व्हावे म्हणून हे पत्र राज्यस्तरीय बँकाचे, कमिटीचे सदस्य असलेल्या सर्व बँकांना पाठवण्यात आले आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button