शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनो हे नक्की वाचा

शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनो हे नक्की वाचा
विविध शासकीय योजनांचा लाभ आता ऑनलाईन नोंदणी झालेल्या आधारावरच दिला जाणार आहे यासाठी पीक नोंदणी आवश्यक केली आहे.नोंदणी न केल्यास विमा तसेच इतर शासनाच्या लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते असे शासन संकेत असतानाही पीक नोंदणी शेतकऱ्यांची उदासीन दिसून येत आहे.रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी घेण्याचे काम सध्या सेलू तालुक्यात सुरू आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्याची मोहीम तहसील प्रशासनाने रब्बी हंगामात हाती घेतली आहे
त्यासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील स्वस्त धान्य दुकानदार यांना उद्दिष्ट दिले असून यांचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. ई पीक पाहणी ॲप चे आता व्हर्जन टू आले आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप – व्हर्जन 2 या अपडेटेड ॲपमध्ये पिकांची माहिती कशी नोंदवावी ?
ई-पीक पाहणी व्हर्जन-२ मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ॲप डाऊनलोड करा, ॲप मध्ये नोंदणी करा, रब्बी हंगामाची पीक पाहणी स्वत: नोंदवा आपल्या मोबाईल वरून, आवश्यक वाटल्यास ४८ तासात दुरुस्ती करा व ४८ तासानंतर आपण नोंदविलेली पीक पाहणी येणार आपल्या सातबारावर.