लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात तेजी काय आहे सध्या सोन्याचा भाव जाणून घ्या?…

Gold price today लग्नसराईमुळे सोने चमकले पंधरा दिवसांत प्रति तोळा १,७०० रुपयांची वाढ
Gold price today नमस्कार मंडळी लग्नसराई मध्ये सोने घ्यायचा विचार करताय तर चला मग पाहूया सोन्या चांदीचे सध्या सुरू असलेले भाव….
लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे दिवसेंदिवस सोन्याच्या खरेदीमध्ये मागणी वाढत आहे यामुळे सोन्याच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे.
चला तर आज जाणून घेऊया सोने आणि चांदीच्या भावातील चढ-उतार या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया.
हे सुद्धा नक्की वाचा…हरभरा पेरणाऱ्या शेतकऱ्यांना हे नक्की वाचा
गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे १,७०० रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात २,५०० रुपयांची वाढ झाली आहे.
२६ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे दरात वाढ झाल्याची माहिती सोने चांदीच्या व्यापाऱ्याकडून मिळत आहे.
ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांच्यासाठी परतावा घेण्याची ही संधी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
यंदा दिवाळीत सोने, चांदीचा दर कायम होता. सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार, तर चांदीचा दर प्रति किलो ५९ हजार होता. तोच दर पाडवा, भाऊबीजेनंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता.
२९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे, तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती.
४ नोव्हेंबरला सोने प्रति तोळा ५० हजार ८००, तर चांदी ५९ हजार ५०० (जीएसटीविना) होती.
या महिन्यामधील सोन्या-चांदीच्या भावातील चढ-उतार आपण खालील तक्त्याच्या माध्यमातून जाणून घेऊया…
सोन्या चांदीचे भाव मागील काही दिवसातील
रानडुकराच्या त्रासातून असा करा पिकाचा बचाव शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी आणला डुकराच्या तोंडाला फेस