kisan credit card scheme किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज , किसान क्रेडिट साठी लागणारे कागदपत्रे आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट
प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड ही स्कीम केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे

प्रस्तावना
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले ग्लोबल मराठी या मराठी ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे
या आजच्या ब्लॉगमध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर सर्व शेतकरी बांधवांनी हा पूर्ण ब्लॉग वाचावा ही नम्र विनंती ,प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड ही स्कीम केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे केसीसी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार पर्यंतचे कर्ज वितरित केल्या जाते यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव खूपच कमी असल्यामुळे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी हा चांगला पर्याय असू शकतो.kisan credit card scheme
या किसान क्रेडिट योजना अंतर्गत शेतकरी आपला पिकाचा इन्शुरन्स देखील काढू शकतात एखाद पिक धोक्यात आले असल्यावर त्यापासून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते . या ब्लॉगमध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय हे पण माहीत करून घेणार आहोत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची प्रक्रिया काय त्याला लागणारे कागदपत्र काय याची पण माहिती सविस्तर घेणार आहोत. तुम्हाला किसान क्रेडिट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या ब्लॉग बरोबर असेच कनेक्ट राहा .या योजनेचा अंतर्गत केसीसी कार्ड ही भारताच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केली योजना आहे या योजनेअंतर्गत 14 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तसेच क्रेडिट कार्ड साठी सरकारने दोन लाख कोटीची तरतूद केली आहे. तुम्ही शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तसेच तुम्ही पशुपालक किंवा मच्छिमार असाल तरी किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता .kisan credit card scheme
सरकारने या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट जारी केली आहे
केसीसी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
आधार कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन,विज बिल ,ओळखपत्र खाते बुक
आधारलिंक केलेले बँक खाते असावे
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
पॅन कार्ड
शेतकऱ्याकडे शेतीसाठी योग्य जमीन असावी
शेतकरी हा मूळचा भारतीय असला पाहिजे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध व्हावे यामुळे ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे आणि थोडासा का होईना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे त्यामुळे केसीसी क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे किसान क्रेडिट योजनेसाठी काही पात्रता दिलेले आहेत त्या खालील प्रमाणे आहेत.
- अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्ष असावे
- साठ वर्षे पेक्षा जास्त वेळ असलेल्या साठी सह अर्जदार असणे आवश्यक आहे
- सर्व शेतकरी ज्यांच्याकडे शेत जमीन आहे
- पशुसंवर्धन हा व्यवसाय करणारे शेतकरी
- देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत
- मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी यात पात्र आहेत
- पट्टेदार व भाडेकरू या योजनेचा लाभ घेऊ शकतात
किसान क्रेडिट कार्ड साठी खालील बँकेची नावे आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईट चे नाव यादीत दिले आहेत तुम्ही त्यावर क्लिक करून अधिकृत केसेस साठी अर्ज करू शकता