राशी भविष्य

नोव्हेंबर महिन्यातील राशी भविष्य……….

जाणून घ्या या महिन्याचं राशी भविष्य……..

मेष:- आपल्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही गोड बोलून आपला कार्यभाग सादा. छोट्या कामासाठी अधिक वेळ खर्च होईल. उत्तराध यशदायी जाईल. आर्थिक व्यवहारात झालेल्या लाभाने आत्मविश्वास वाढेल.

वृषभ:- तुमच्या मनात जे आहे ते साधे कसे करायचे आराखडे तयार ठेवा मित्रपरिवार शाब्दिक द्वंद टाळा. आर्थिक बाजूकडे दुर्लक्ष नको. ऊतारधारत विरोधकांना नामविने फारसे कठीण देणार नाही.
तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्नांना यश नक्की मिळेल.

मिथुन:- नोकरी व्यवसाय क्षेत्रात तसेच कौटुंबिक जीवनात काही मनाविरुद्ध घडणाऱ्या बाबीमुळे मनस्थिती थोडी अस्थिर होण्याची शक्यता आहे. ‘ससुरबाई तुझी पाठ मऊ’ हे सूत्र घेऊन मार्गक्रमण करणे हितावह . प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क:- तुमची आक्रमकता या महिन्यात वाढणार आहे. तुमच्या बोललेले विरोधक प्रभावित होतील. विरोधकांशी संवाद साधा. सरकारदरबाबी कामे मार्गी लावू शकाल. आवक उत्तम राहील गुंतवणूक वाढवा. प्रवास थोडा त्रास दाई ठरेल. प्रवास टाळा.

सिंह:- सध्या सुरू असलेले संघर्ष या महिन्यात पूर्वधार्थ सुरूच राहील. उत्तरदार तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होतील. कामानिमित्त प्रवास संभवतो. कुटुंबातील व्यक्तीकडून आनंददायी वार्ता कानी पडेल. घरच्याना मदत करा . त्यांना वेळ द्या. त्यांच्या साठी वेळ काढा.

कन्या:- या महिन्यात इतर काही व्यापात गुंतून राहिल्याने आपले प्रकृतिक स्वास्थाकडे दुर्लक्ष तर होत नाही याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक चढ-उतार लक्षात घेऊन कर्तव्यपूर्ती साठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मोठ्या प्रलोभानाची गुंतवणूक टाळा. सरासरी मोठे निर्णय घेण्यापासून रोख ठेवा.

तूळ:- समजष्याने निर्णय घ्या.अशीच या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे आवश्यक तेवढाच खर्च करा. विनाकारण खर्च करू नये. मित्रमंडळीत वाद टाळा. कौटुंबिक सलोखासाठी थोडी तडजोड करावी लागेल. कार्यक्षेत्रात वेळेला महत्त्व द्या.

वृश्चिक:- आत्मविश्वास वृद्धिगंत करणारा असा काळ आहे. समाजातील आपल्या ओळखीचा फायदा करून घ्या काहींच्या घरात शुभ कार्य घडतील भावंडाशी आलेले वाद चिघळू न देणे तुमच्या हिताचे ठरेल.

धनु:- या महिन्यात तुमचे कर्तुत्व आणि ग्रहमानाचे अनुकूलता याचा उत्तम वेळ बसणार आहे.
मनसुबे प्रत्यक्षात आणण्यास अनुकूल काळ आहे. प्रलोभनाने विचलित होऊ नका जवळच्यांचा क्रोध जाणून घेऊन आपल्या वागण्या बोलण्यात बद्दल करणे आवश्यक आहे. विरोधकांशी संवाद करणे टाळा.

मकर:- आपण अडचणीत असलो तरी प्रसंगी इतरांकडून मदत घेतलीच पाहिजे. मित्रपरिवार किंवा नातेवाईक तुम्हाला मदत करतील. सध्या शांत बसून चालणार नाही. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावे. संवादाने प्रश्न सुटतात हे विसरू नका. उत्तराधार्त तुमचे पारडे थोडे जड होईल.

कुंभ:- विरोधकांना संधी मिळेल असे कुठलेही कृती तुमच्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक उलाढालीस योग्य दिशा मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचा सहवास मन सुखवणारा ठरेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन:- घरातील मतभेद हे फार त्रासदायक असतात. फक्त ते टाळच. पूर्वधार्थ आर्थिक आवक चांगली राहील. सरकारी फायदे कानून नियम, यांची चौकट मोडू नका. जबाबदारीचे भान ठेवून वागा. उत्तराधारत काही अनपेक्षित खर्च करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button