सामाजिक

कोजागिरी पौर्णिमा – रात्री दूध पिण्याची रीत

भारत हा असा देश आहे की प्रत्येक महिना सणांनी भरलेला आहे..असे म्हणणे अतिशियोक्ती नाही ठरणार की भारतात आठवडयाला कोणता तरी सण असतोच..

या दिवशी आपण लहानपणापासून रात्री जागरण करतो..काही जण झोपले असतील तर त्याला उठवतो १२ वाजले की..आणि सूरू होतो आपला कार्यक्रम ..दूधामध्ये चंद्र दिसला की आपण त्या दूधाचा आस्वाद घेतो..पण कोजागिरी पौर्णिमा ने आपण का साजरी करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

या दिवशी चंद्र मंडळातून पृथ्वी वर महालक्ष्मी येते आणि प्रश्न विचारते ,कोण जागर्ति..म्हणजे कोण जागृत आहे..कोण आपल्या कर्तव्याबाबत जागृत आहे,कोण निसर्गातील नियम पाळत आहे,कोण राष्टहितामध्ये कोण जागृत आहे,जे लोग या सर्व गोष्टी साठी जागृत असतात त्या लोकांना महालक्ष्मी वरदान देउन जाते..

मग काही जण फक्त त्यात दिवशी जागतात आणि ही पौर्णिमा साजरी करतात..एक दिवस जागृत आपल्याला नाही रहायचे ,आपल्याला आयुष्यभर जागृत रहायचे आहे ,तर महालक्ष्मी आपल्याला वरदान देईल..पण ते असे रात्र काढून जागणे नव्हे,आपले कर्तव्य समजून,आपली देशभक्ती,आपल्या भूमीविषयी प्रेम,करूणा,दया,समाजासाठी चांगली भावना,दिनदुबळयांना मदत,सतत देवाचे नाव ,सतत चांगले विचार,सतत सहकार्याची भावना,अशा अनेक कामात देवीला अपेक्षा आहे आपल्याकडून जागृत राहण्याची..

दुसरे असे कारण पण आहे की भगवान श्रीकृष्णांनी महारासलीला-रासक्रीडा केली होती.त्या मुळे या दिवशी लक्ष्मीची ,कूबेराची व इंद्राची पूजा केजी जाते..

या दिवशी चंद्र पूथ्वीच्या खूप जवळ असतो.त्यामुळे त्याचा परिणाम चांगला आपल्या शरीरावर तसेच औषध बनवण्यासाठी सुध्दा होउ शकतो..

काही ठिकाणी या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवसापासून पावसाळा संपून सर्वत्र सुंदर हिरवेगार वातावरण तयार होत असते..नविन पीक आलेले असते ..धान्य लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराला नवीन धान्याचे तोरण बांधतात..दाराबाहेर लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळया घालतात,दिवे लावतात,सर्वजण चंद्रप्रकाशात गाणी,भजने म्हणतात.भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून कोजागिरी पौर्णिमेचे महत्व निश्चितच जास्त आहे..

आपल्या फक्त दूध प्यायचे आहे ,हे एवढेच माहित असते..आपण आपल्या सणाबद्ल हळू हळू का होईना माहिती घेत राहणे गरजेचे आहे..

आता दूधाचा विषय आला तर दूध कसले असते ते पण जाणून घेउया ..या दिवशी प्रत्येकाच्या घरी कमीत कमीत १ लिटर दूध आणता म्हणजे आणतातच..आणि त्या मध्ये केशर असेल ,काजू असतील,बदाम,जायफळ ,साखर, अशा अनेक चवीष्ट पदार्थ मिसळून त्या दूधाला आठवले जाते..आणि चाजू होतो दूध आणि चंद्र यांचा खेळ..दूधामध्ये जर चंद्र दिसेपर्यंत दूधाला हात लावत नाहीत..दूध पिण्याची इच्छा झालेली असते पण जोपर्यंत चंद्र त्या दूधामध्ये दिसत नाही तोपर्यंत कोणीच त्या दूधाला हात लावत नाही..

शेवटी आपण लक्ष्मी पूजन श्लोक नजरे खालून घालू या..

सुरासुरंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्

परावरं पातू वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिध्दये

भवानि त्वं महालक्ष्मी : सर्वकामप्रदायिनी सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते

नतस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्

ओम महालक्ष्म्ये नम: प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि.

भारत हा उत्सवप्रिय देश आहे .अशे उत्सव आपण जपले पाहिजे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button