आमचे भविष्य राजकारणांच्या हातात

आम्ही गेली साधारण ६ वर्षे झाली स्पर्धा परिक्षा क्षेत्रामध्ये आहोत..पण आमच्या वाटेला खूप कमी परिक्षा आल्या..महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा आमच्या सारखे उत्तीर्ण होउ शकले नाहीत..मग कमीत कमीत वर्ग ३ आणि वर्ग ४ परिक्षा तर उत्तीर्ण होउन आमचे जीवन बदलेल या आशेवर आम्ही बसलो आहोत..पण गेली ३ वर्षे एक दोन परिक्षा सोडल्या तर सरकारने परिक्षा घेतल्याच नाहीत..त्यात त्यांनी करोनाचे कारण दिले..चला ते पण ठिक आहे ,नंतर तर जागा काढतील असे वाटले पण नेहमी प्रमाणे आम्हाला गाजर दाखवण्यात आले ..आता च्या सरकारला जर जाग येईल आणि जागा काढतील या आशेवर बसलो होतो पण त्यांनी पण आमच्या हातात गाजर ठेवले ..
२०२४ च्या तोंडावर सरकार जागा काढेल असे वाटत होते तर आता मराठा आरक्षण भेटावे म्हणून आमचा समाज आता एकत्र यायला चालू झाला आहे..त्याचा परिणाम सरळ सेवेवर होणार यात काय दुमत नाही..
मराठा समाज एकत्र बघून ,समाजाची ताकद बघून खूष व्हावे का या आंदोलनामुळे परिक्षा पूढे जाणार या मुळे दु:खी व्हावे अशा अवस्थेत स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा युवक सध्या आहे.
आज मराठा समाज आपली ताकद दाखवत आहे. ते बघून मन प्रसन्न झाले पण त्याच बरोबर मना दु:खी पण झाले की आता ज्या परिक्षा होत नव्हत्या त्या पण आता अजून या मोर्चामुळे पूढे जाणार ,कारण सरकार काय आरक्षण मराठा समाजाला देत नाही लवकर आणि मराठा समाज आरक्षणाशिवाय आता शांत बसणार नाही..याचा तोटा आम्हाला सहन करावा लागेल..अजून किती वर्षे भरती होणार नाही हे आता हे दोघेच सांगू शकतील..
किती महत्वाचा विषय असताना सुध्दा या विषयावर सरकार जर गंभीर नसेल ,तात्काळ निर्णय घेत नसतील तर त्यांना खरच जनतेची काळजी आहे का,खरच त्यांना युवकांचे प्रश्न कळतात का,युवकांचे किती नुकसान होत आहे याची त्यांना जाणीव आहे का,का येत नाहीत सर्व राजकारणी पक्ष एकत्र आणि का घेत नाहीत निर्णय..
एवढा खालच्या पातळीवरचे राजकारण का करतात ,युवकांच्या भावनांशी का खेळतात तूम्ही..
आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानी लोक नाहीत का, की याचा तोडगा काढायला..का प्रत्येक वेळेस आंदोलन केल्याशिवाय काय भेटणारच नाही..
चला एकवेळेस आमच्या पूढच्या पिढी साठी आम्ही त्याग करायला पण तयार आहोत पण या गोष्टी वर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे..
त्याला एक वर्ष लागू दयात पण कायदयाचा अभ्यास करून ,कायद्याचे बारकावे लक्षात घेउन या वेळेस निर्णय आला तर आमच्या पूढच्या पिढीला त्रास होणार नाही.