सामाजिक

तेव्हा कळतं कि..

नदीचं पाणी जेव्हा पात्रातून बाहेर पडून,

स्वतः च्या घराच्या उंबऱ्याला लागतं,

तेव्हा कळतं कि,

महापूर म्हणजे नेमकं काय असतं?

जेव्हा स्वतः घर सोडून,

दुसरीकडे स्थलांतरित व्हायची वेळ येते,

तेव्हा कळतं कि,

पुरग्रस्थ म्हणजे नेमकं काय असतं?

पुरात अडकलेल्या आपल्याला,

जेव्हा एखादी rescue team वाचवते

तेव्हा कळतं कि,

NDRF team म्हणजे काय असतं?

एकवेळच्या जेवणासाठी सुद्धा,

आपल्याला एखाद्या ची वाट पाहावी लागते,

तेव्हा कळतं कि,

“अन्नछत्र फौंडेशन” म्हणजे नेमकं काय असतं?

मोडून पडतं जेव्हा सारं काही,

पण लढण्याची जिद्द कायम असते,

तेव्हा कळतं कुसुमाग्रज यांची,

“कणा” ही कविता नेमकी काय होती?

घरात बसून सोशल मीडिया वर,

पुराचे अपडेट्स सगळेच टाकतात,

पण जेव्हा स्वतः जाऊन तिथं,

मदतकार्यात आपण उभारतो,

तेव्हा कळतं कि,

“माणुसकीचा धर्म म्हणजे काय असतो?”

Writter : Kishor Thalkar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button