आरोग्यजागतिकमनोरंजनसामाजिक

today’s youth generation : काल्पनिक जग आणि आजची तरूण पिढी..

Fantasy world and today's youth generation

today’s youth generation : मनोरंजनाचे साधन इतके जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे या काल्पनिक दूनियमध्ये आजची पिढी पूर्णपणे मग्न झाली आहे. त्या मध्ये मी पण आलोच ,काही वर्षापूर्वी मी कमीत कमीत १०० एकजणांच्या सहज संपर्कात होतो पण ज्या वेळेपासून माझ्या हातामध्ये मोबाईल आला आहे त्या वेळेपासून माझ्या मोबाईल मध्ये १०००च्या आसपास व्यक्तींचे नंबर आहेत पण ते फक्त नंबर म्हणून राहिले आहेत,आमच्यात जास्त बोलणे वगैरे होत नाही..कारण मी काल्पनिक दुनियेमध्ये एवढा मग्न झालो आहे की मला कोणी नाही बोलले ,कोणत्या मित्राचा कॉल आला नाही,आपल्या आजूबाजूच्या माणसांचा आपल्याला कॉल आला नाही..मला आता फरकच पडत नाही..कारण मी या काल्पनिक दुनिमध्ये खूप रमलो आहे.

New Districts in Maharashtra : महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे होणार,

नवीन जिल्ह्यांची यादी पहा

चार जणांबरोबर आपण राहायचे असते ,तू कसा आहेस ,तूला कशाची मदत हवी का,या गोष्टी बोलून त्याच्या आयुष्यात काय चालू आहे ,आपल्या आयुष्यात काय चालू आहे,देवाण घेवाण आता या मनोरंजनाच्या दुनियेमध्ये नाहीशी होताना दिसत आहे..

व्यक्ती एकलकोडा होताना दिसत आहे, स्टेटस ठेवण्यामध्ये आजचा तरूण वेळ वाया घालवत आहे,मी किती चांगला ,मी काय करतोय हे सांगण्यात आजचा तरुण वेळ वाया घालवताना दिसत आहे,त्यामध्ये तात्पूरता आनंद मिळतो पण ते केळेच नाही तर काही जणांना असे वाटत आहे की आपण काहीतरी विसरलो आज..

तसेच या स्टेटसमूळे तो किती खूश आहे त्याच्या आयुष्यामध्ये म्हणून काही तरूण स्वत:ला कमी समजत आहेत,दुसऱ्याचे स्टेटस पाहून ते नाराज होताना दिसत आहेत..

School Holidays In 2023-24 : शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, 2023-24 मध्ये ७८ दिवस सुट्ट्या..!

तरूणच्या आयुष्यात पुस्तके नाहीसे होण्यात काल्पनिक जग कारणीभूत ठरत आहे, काल्पनिक जगातील चित्र ,व्हिडिओ पाहून त्या प्रमाणे जगण्याचा प्रयत्न आजचा तरूण करताना दिसत आहे,मूलांना कमी वेळेमध्ये लवकर यश पाहिजे आहे त्यासाठी ते वेगवेगळया मार्गाचा वापर करून आपला वेळ वाया घालवत आहेत.

या काल्पनिक दुनिया मध्ये आपली दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची सवय वाढत आहे,खरा आनंद या काल्पनिक दुनियामुळे नाहीसा होताना दिसत आहे..

काही जण तर आपले ध्येय काय आहे हेच विसरले आहेत आणि या काल्पनिक दुनियात रमले आहेत,काही जण अभ्यास करणे सोडून फक्त ते रील्स बघण्यात पूर्ण दिवस घालवतात.. today’s youth generation

मोदी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे.

जसे या काल्पनिक दुनियेचे तोटे आहेत तसेच फायदे पण आहेतच ..काही जणांनी स्वत:च्या कौशल्याचा वापर करून या काल्पनिक दुनियेला संधीत रूपांतरित केले आहे..काही जणांना आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:चे वेगळे आयूष्य या काल्पनिक दुनियेमध्ये निर्माण केले आहे..

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी माहीत करून घेण्याची जिज्ञासा आपल्यात वाढली आहे,ज्या गोष्टी आपल्या ध्येयासाठी महत्वाच्या नाहीत त्यापण माहीत करून घ्यायची गरज आपल्याला वाटू लागली आहे..

Fantasy world and today’s youth generation : जे महत्वाचे नाहीत ते पण आपण पाहत बसत आहोत..आयुष्यातील गंभीरपणा नाहीसा होत आहे,

आपली मनाची शांती या काल्पनिक दुनियेमुळे नाहीशी होत आहे..आपल्याला याचे व्यसन लागलेले आहे..
प्रत्येक गोष्टीतील माहिती माहित करूल घेउन आपल्याला काय करायचे आहे,

न कळत आपण दुसऱ्या व्यक्तीची आपल्या आयुष्याबरोबर तूलना करत आहोत.अशा सवयी मुळे आपल्या आयुष्यात फक्त निराशाच येणार आहे..

Tea Side Effect : चहा पिल्याने होऊ शकते भयानक नुकसान,

लगेच जाणून घ्या

या काल्पनिक दुनियेचा वापर कमी करून आपण आपल्या खऱ्या मित्रात रमले पाहिजे,आपण आपल्या आजूबाजूच्या जगात रमले पाहिजे,आपण जिथे आहोत तेथे खूश राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे,या काल्पनिक दुनियेच्या जोक्स वर हसण्यापेक्षा आपल्या मित्राबरोबर हस्य निर्माण करता आले पाहिते..काल्पनिक दुनियेतील पर्यटन स्थळ पाहत बसण्यापेक्षा आपण आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या पाहिजे,आपण आपल्या खऱ्या आयुष्यात आनंदी कसे राहता येईल ,कोणत्याही वस्तूचा वापर न करता ते आनंदी राहता आले पाहिजे,किती दिवस त्या काल्पनिक दुनियेमध्ये रमत बसणार,एक ना एक दिवस तूम्हाला त्यातून बाहेर यावेच लागेल,मग आजच त्या काल्पनिक दुनियेतून बाहेर या आणि खऱ्या आयुष्याचा आनंद लूटा..एकमेकांना साथ दया ,एकमेकांच्या सानिध्यांत वेळ खर्च करा.. today’s youth generation

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button