ट्रेंडिंगबातम्या

Bank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम

Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा.

Bank Locker Rules Change From 1st January 2023: नव्या वर्षाची (New year 2023) सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. असं असतानाच येणाऱ्या वर्षासाठी अनेकजण काही संकल्प ठरवत आहेत. काहींना (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव करत Savings वाढवायची आहे, तर काहींना करिअरमध्ये नवी उंची गाठायची आहे. पण, या साऱ्यामध्ये काही बदलांसाठी तुम्ही तयार आहात का? हो, नव्या वर्षात काही नियम बदलणार आहेत, ज्यांचे थेट परिणाम तुमच्यावरही होऊ शकतात. त्यामुळं काहीही नवं ठरवण्यापूर्वी या बदलांची तुम्हाला कल्पना असलेली बरी. Bank Rules

बँकेत खातं असणाऱ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा (Bank Account Rule change)

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकर संदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा. RBI च्या नव्या नियमांनुसार 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकरशी संबंधित सर्व नियम पूर्णपणे बदलणार आहेत.

जन धन खात्यावर जमा झाले 10,000 रुपये ,पहा सविस्तर

नव्या नियमावलीनुसार लॉकरमध्ये (Bank lockers) असणाऱ्या खातेधारकांच्या सामानाचं कोणत्याही प्रकारे नुसकान झाल्यास बँक त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी बंधनकारक असेल. या धर्तीवर ग्राहकांना 30 डिसेंबरपर्यंत एका Agreement वर सही करावी लागणार आहे. ज्यामध्ये लॉकरबाबतची सर्व माहिती असेल. यामुळं ग्राहक/ खातेधारक त्यांच्या ऐवजाविषयी कायम माहिती मिळवू शकतील. 

नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीच करा ‘हे’ काम

 

वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी खातेधारक/ ग्राहकांनी अॅग्रीमेंट करणं बंधनकारक असण्यासोबतच यासाठी ते पात्र असणंही महत्त्वाचं असेल. सध्याच्या घडीला लॉकर अॅग्रीमेंटसाठी बँकांकडून ग्राहकांना वारंवार मेसेज देण्यात येत आहेत. (PNB) पंजाब नॅशनल बँकेकडूनही ग्राहकांना यासंदर्भातील इशारावजा मेसेज दिला आहे. Bank Rules

मोदी सरकारची मोठी योजना, मुलींना मिळणार लाखो रुपयांचा लाभ

नियम बदलाचा ग्राहकांना फायदा 

आरबीआयच्या (RBI) या बदललेल्या नियमाचा ग्राहकांनाच मोठा फायदा होणार आहे. कारण, बँकेच्याच बेजबाबदारपणामुळे जर ग्राहक/ खातेधारकांच्या ऐवजाचं नुकसान होतं तर याची भरपाई बँकेकडूनच करण्यात येईल. त्यामुळं आता बँकांच्या जबाबदारीत आणखी भर पडली आहे. परिणामी बँकेतील लॉकरप्रतीचा परतावा हा 100 टक्के असणार आहे असंच म्हणावं लागेल.

आयपीएल मध्ये सर्वात महाग ठरला हा खेळाडू,इतिहासातील सर्वात मोठी लागली बोली

नुकसान भरपाई केव्हा मिळणार नाही? 

नव्या नियमावलीनुसार वीज कडाडून नुकसान झाल्यास, भूकंप किंवा पूर आल्यास, वादळाचा तडाखा बसल्यास किंवा तत्सम नैसर्गिक आपत्ती आल्यास ग्राहकांचा बेजबाबदारपणा पाहता लॉकरमध्ये असणाऱ्या सामानाची हानी झाल्यास यासाठी बँक जबाबदार नसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button