
‘Bhart Jodo Yatra | गांधी’ होणे खरेच इतके सोपे नाही !!
Bhart Jodo Yatra राहुल गांधींच्या ‘भारत जोडो पदयात्रे’ वर ‘टीका करणारा भाजप आणि समांतर विचारांच्या अराजकीय संस्थाही आता गप्प झाल्या आहेत.
ही यात्रा इतक्या जिदीने लाखोची गर्दी करीत पुढे सरकेल, याचा अंदाज त्यांना आला नसावा.
गेल्या पाउन दिवसांमध्ये राहुल गांधी आणि सहकाऱ्यांनी २२०० कि.मी. अंतर कापले आहे.
दररोज २५ कि.मी. पायी चालणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. विविध संकटांवर मात करीत.
वाटेत येणाऱ्या अडचणींचा सामना करीत आणि आपल्यातील ऊर्जेला, इच्छाशक्तीला सर्वसामान्यांच्या सेवेला जुंपत राहुल गांधी निघाले आहेत.
सात सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेतून आश्चर्यकारक बदल राहुल गांधी यांच्यात दिसून येतो ते लोकांना आवासक वाटायला लागले आहेत.
भारत जोडो यात्रेतून ज्या मूल्यांची पखरण होत आहे. तेच सर्व धर्मांनी सांगितलेलं सार आणि माणुसकीचा गाभा आहे.
केंद्रीय राजवटीतील प्रस्त एकाधिकारशाहीला थोपविण्यासाठी ‘निर्भया’ म्हणून बळ देणारी ही यात्रा आता उत्तर भारतात प्रदेश करेल.
दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रत यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला.
शेगावमध्ये स्वयंस्फूर्तीने लाखो लोक सभेसाठी आलेत. मध्य प्रदेशात थंडीतही गर्दी आणि उत्साह आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे पाठ फिरवत आणि त्याच्या परिणामाची जराही पर्वा न करता राहुल गांधींनी २६ जानेवारीला श्रीनगरमध्ये तिला फड़ण्याचे ध्येय ठेवले आहे.
Bhart Jodo Yatra कन्याकुमारी ते श्रीनगर असा राहणार भारत जोडो यात्रेचा प्रवास
श्रीनगरमध्ये यात्रेत अद्याप परवानगी मिळाली. नाही. ती मिळणार नसेल तर राजकीय वादाला तोंड फुटेल.
सध्या राहुल गांधी यांच्यात केशवसुत यांचा संचार दिसतो. नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे.
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ब्राह्मण नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा हेच त्यांच्या यात्रेचे सार आहे.
‘हिंमत असेल तर अडवा’ अशी घोषणा देत राहुल गांधींनी केंद्रीय राजवटीसमोर धडक आव्हान उभे केले आहे
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी या यात्रेमागील उद्देशच्या पक्षीय राजकारणाचा नसल्याचा खुलासा केला आहे.
परंतु कसला पुनरुज्जीवित करणे हाही या यात्रेचा एक उद्देश आहे, हे लपून राहिलेले नाही.
मोदींपेक्षा राहुल गांधी परवडले म्हणून या यात्रेसोबत सामाजिक चळवळीतील दीडशे संघटना जोडल्या गेल्या आहेत.
ज्यांनी सोनिया आणि राहुल गांधी याना • विरोध केला तेही लोक या यात्रेत सहभागी होताहेत. काँग्रेसचे तक्रारवादी नेतेही राहुल गांधी यांच्यासोबत चालताना आणि सभेच्या ठिकाणी व्यासपीठावरही दिसत आहेत.
‘मी यात्रेत सहभागी होणार नाही असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज च शेगावच्या सभेत व्यासपीठावर होते.
राहुल गांधीनी प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले. त्यामुळे चव्हाण हत्तीचे बळ संचारले आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत कलहातही सकारात्मक बदल या यात्रेने घडवून आणला आहे. यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी प्रत्येक प्रदेश पाहत आहेत. गावागावांत जाऊन तेथील प्रश्नांची माहिती घेतात तेथील माणसे आणि समूहात वावरतात.
Narco test | नार्को टेस्ट गुन्ह्यांचा रहस्यभेद करणारी चाचणी, नेमकी कशी असते ही चाचणी ?
वेगवेगळ्या समाजघटकांतील लोक त्यांना भेटतात ते सगळ्यांचे ऐकून घेतात. सफाई कामगार असो, शेतमजूर, कष्टकरी असो की लेखक, साहित्यिक किया चित सगळे राहुल गांधींसोबत दिसतात.
देशाला एकाधिकारशाहीतून बाहेर का म्हणून नागपूरच्या ९४ वर्षाच्या सर्वोदयी नेत्या लीलाताई चितळे नागपूरहून ३०० कि.मी. लांब असलेल्या पातूर येथे भारत जोडो यात सहभागी होतात,
विचारवंत गणेश देवी असोत किंवा नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर हे सर्व यात्रेत सहभागी होतात.
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ‘हम साथ साथ है’ चा नारा देत सहभागी.Bhart Jodo Yatra

निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेल सहभागी झाले आहेत. मोदींच्या कारकिदीवर त्यांची नाराजी आहे.
मला मरण आले तर या यात्रेत यावे; देशासाठी जीवन सार्थकी ल्याच्या त्यांच्या भावना यात्रेत सहभागी तरुणांना देऊन जातात.
महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याची सामाजिक भूमिका आणि सनातनवाद्यांकडून होणारा विरोध याबाबत राहुल गांधी प्रा. मानव यांच्याकडून तब्बल अर्धा तास ऐकून घेतात
यावर राहुल गांधी यांची सर्वव्यापक विषयांवरील मांडणी ही त्यांच्यातील चिंतनाची, अभ्यासाची आणि प्रगल्भतेची ओळख करून देते.
हे सगळे विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते राहुल गांधींना का भेटत? यांचा हेतू काँग्रेसला देगे किंवा राहुल गांधींना मोठे करणे नाही.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आलेले संकट व लोकशाहीत निर्माण झालेले भय याला आव्हान देणारे राहुल गांधीच आहेत यावर सगळ्यांचा विश्वास दिसतो.
त्यामुळे लोकशाहीचे समर्थक असलेल्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळतोय.
महिलांचे प्रतिनिधित्व लक्षवेधी
योग विविध स्तरावर विभाजन करावे लागेल. राहुल गांधींना बघणारा आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेणारा एक वर्ग आहे.
रोहित वेमुलाची आई राहुलला आपल्या मुलाप्रमा छातीशी धरते आणि या वेळी अनेकांचे डोळे अन वाट मोकळी करून देतात. असे शेकडो भावपूर्ण प्रसंग या यात्रेने अनुभवले आहेत.
माणसं जो काम या यात्रेने केले आहे. क्रीडापटू रुपेरी पडद्यावरील कलाकार या यात्रेत सहभागी होत आहेत.
यात्रेचे वैशिष्ट म्हणजे तणांचे लोंढे भारत जोडोत आहेत अशीच तरुणांची गर्दी मोदींच्या सोबत असते म्हणजे तरुणांचे विभाजन होत आहे का? असे होत असेल तर लोकप्रियतेची धरण असल्याचे संकेत म्हणावे लागेल.
गेल्या अडीच महिन्यांतील या यात्रेवरून नजर टाका. एक लक्षात येईल याचेत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षवेधी आहे.
विविध वळतील आणि राजकीय क्षेत्रातील तरुणी राहुल गांधींसोबत सहभागी होत आहेत.
मनमोकळेपणे संवाद साधताना दिसतात. प्रत्येक हाताला काम मिळावे, महागाईपासून बचाव व्हावा याबाबत तरुण ते करतात यात्रेतील प्रत्येकास वाटते राहुल गांधी आपल्यासोबत आहेत.
या वाटण्यावर राहुल गां किती खरे उतरतात, ते येणारा काळच सांगत परंतु भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने
विविध राजकीय पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्त आणि विचारवंतांचे एकत्र येणे यामागे किमान समान कार्यक्रम आहे.
तो मोदीविरोधाचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंह ‘दिनकर’ यांनी संस्कृतीचे चार अध्याय लिहिले आहेत.
राहुल गांधी यांची ही यात्रा देशाच्या संस्कृतीचा पाचवा अध्याय असू शकतो.
ही यात्रा म्हणजे एकीकडे भारतातील विविधता, समृद्धी, संस्कृती आणि दुसरीकडे अक्राळविक्राळ समस्या नि प्रश्न या सगळ्याचे प्रतिबिंब आहे.
यातून एक जाणवते ते म्हणजे ‘गांधी’ होणे खरेच सोपे नाही!Bhart Jodo Yatra
– ॲग्रोवन , विकास झाडे .