क्रिकेटखेळ

भारताला दिवाळीची विराट भेट

भारताची विजय सुरुवात

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात………


या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवलं
भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला गोलंदाजी घेतल्यानंतर पाकिस्तानकडून सर्वप्रथम बॅटिंगसाठी मोहम्मद रिजवान आणि बाबर आजम आले या जोडीने पाकला पाहिजे जशी सुरुवात करून दिली नाही बाबर आजम हा दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर हर्षदीप चा शिकार बनला त्यानंतर रिजवान पण आऊट झाला रिजवानने चार रन तर बाबर स्वतःचे खाते पण उघडू शकला नाही आणि त्यानंतर मसूद आणि अहमद यात अहमद यांनी पाक चा डाव सावरला भारताच्या स्पिन गोंलदाज अक्सर पटेल आणि अश्विन वर दबाव टाकत अतिशय छान‌ बॅटिंग केली.


पाकिस्तानकडून अहमदने 34 बॉल मध्ये 51 रन काढले यात चार षटकार आणि दोन चौकाराचा समावेश होता परंतु तो शमीचा बॉलिंग वर पायचित झाला त्यानंतर शादाब खान अवघ्या पाच रन बनवून तो पण तंबूत परतला हैदर अली पण खूप काही साहाय्य करू शकला नाही तो दोन धावा हार्दिक पांड्याचा शिकार बनला त्यानंतर नवाज आणि अशाफ अली हा पण लवकरच बाद होऊन तंबूत परतला त्यानंतर गोलंदाज शहंशाह आफ्रिदी याने आक्रमक बॅटिंग करत आठ बॉल मध्ये 16 रन केले त्यात एक चौकार आणि एक षटकार याचा समावेश होता यामध्ये
यामध्ये वन डाऊन आलेला मसूद हा नॉट आउट राहत 42 बॉल मध्ये52 रन काढले यामध्ये वीस षटकात पाकिस्तानचे संपूर्ण धावा ह्या 159 वर आठ बाद असा झाला
भारताच्या गोलंदाजी मध्ये खास करून अर्षदीपने तीन विकेट बाद केल्या आणि हार्दिक ने ही तीन विकेट बात केल्या भुवनेश्वर आणि शमी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि केल राहुल आले परंतु त्यांना पुरेसे यश आले नाही सुरुवातीला दोघेही चार चार धावा करून तंबूत परतले त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार ने थोडाफार डाव सांभाळला परंतु हारीशच्या राऊफ च्या बॉलिंग वर सूर्यकुमार आउट झाला आणि पंधरा धावावर तंबूत परतला त्यानंतर अक्षर पटेल पण रन आउट होऊन लगेच तंबूत परतला विराट कोहलीला आता हार्दिक पांड्याची साथ लाभली.


विराट कोहली आणि हार्दिक पांड्या मध्ये 78 बॉल मध्ये 113 रनाची पार्टनरशिप झाली या पार्टनरशिप मुळे भारताला अवघड 159 रनाचे लक्ष साधन्यास मदत‌ झाली पण हातातुन गेलेले सामना फिरवला आणि शेवटचा शतकामध्ये 16 रन ची आवश्यकता होती तेव्हा नवाजच्या बॉलिंगवर पहिल्या बॉल मध्ये हार्दिक पांड्या आऊट झाला त्याने 37 बॉल मध्ये 40 रंग काढले परंतु आता पाच बॉल मध्ये 16 जणांची आवश्यकता होती…


अखेरचा ओव्हर 6 चेंडूत 16 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवर हार्दिक झेलबाद झाला तर दुसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एक धाव घेतली तिसऱ्या बॉलवर कोहलीने दोन धावा घेतल्या चौथ्या बॉलवर फुलटाॅस वर डीप स्क्वेअर मध्ये षटकार मारला हा चेंडू कमरेच्या वर असल्याने अंपायरने हा बाॅल नो ठरवला त्यानंतर समोर फ्रि हिट होता परंतु त्याने तो वाईट फेकला त्यानंतरचा चौथा बाॅल फ्री हिट असल्यामुळे विराट हा स्टंप आऊट होऊ शकला नाही त्यात त्यांनी तीन रन धावून काढले पाचव्या बॉल वर कार्तिक स्वीप खेळण्याचा नादात एसटीडी आऊट झाला खेळण्यासाठी आता अश्विन मैदानात आला परंतु हा पण बॉल नवाजणे वाईट टाकला आता एक बॉल मध्ये एक रन काढायचा होता या बॉलवर अश्विन ने समोर फिल्डर वरून मारत विजय मिळवून . या विजयात विराट कोहलीने 53 बॉल मध्ये 82 रन नाबाद काढले त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच ठरवण्यात आले. विजयानंतर विराट कोहली खूप भावुक झाला त्यानंतर सर्व खेळाडूंनी विराटला आलिंगन दिले यात विजयाचे शिल्पकार विराट कोहली आणि हार्दिक पांड्या ठरला विजयानंतर हार्दिक ही खूप भाव झालेला दिसला अशा तऱ्हेने भारताने पाकिस्तानला चार गडी राखून मात दिली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button