Weather today: ढगाळ वातावरणाचा फटका..! घ्या या वातावरणात आपल्या फळबागांची काळजी..

Weather today

Weather today दोन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर बुरशी रोगाची शक्यता आहे. तर पावसामुळे मोहोर गळून जाण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर बुरशी रोगाची शक्यता आहे. तर पावसामुळे मोहोर गळून जाण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीचे क्षेत्र १६, ९७४ हेक्टर असून मुरूडमध्ये १,५९० हेक्टरवर हापूसची लागवड केली जाते. सरकारकडून तीन वर्षांत हेक्टरी ४६ ते ४७ हजार अनुदान देण्यात आले असले तरी लागवडीखालील क्षेत्रात फारशी वाढ झालेली दिसत नाही. कोकणात बहुतांश आंबा लागवड डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनीवर केली जाते. थोडी आम्लयुक्त जमीन आंबा वाढीसाठी पोषक ठरते.Weather today

मोहोर गळती

गतवर्षी सुरुवातीला पोषक वातावरणामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र यंदा वादळी पाऊस व तापमानात वारंवार होणारे बदल, धुके, मध्येच थंडी पडत असल्‍याने मोहोर गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्‍यामुळे फळधारणा ५० ते ६० टक्के कमी झाली आहे.

पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहिल्‍यास फळगळत्‍ाी सुरू होईल. तसेच बुरशीजन्य रोगामुळे फळाचा दर्जाही खालावण्याची शक्‍यता आंबा उत्पादकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच मोहोर गळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवनवीन वाणाची लागवड Weather today

तालुक्यातील आगरदांडा, सावली, भोईघर, बोर्ली -मांडला, साळाव, वळके, शिरगाव या परिसरात कृषी विभागाच्या मदतीने यंदा नवनवीन आंबा बागांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. केवळ पारंपरिक हापूस वाण न निवडता त्यामध्ये किमान १० टक्के लागवड रत्ना, सिंधू, पायरी या वाणाच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे, मात्र सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाने आंबा उत्पादक धास्‍तावले आहेत.

बागांच्या पुनरुज्जीवनाची गरज Weather today

जुन्या झाडांपासून उत्पन्न कमी येत असल्याने बागांचे पुनरुज्जीवन अर्थात छाटणी होणे गरजेचे आहे, मात्र जून २०२० च्या निसर्ग वादळात ५० वर्षांपेक्षा जुनी झाडे जमीनदोस्त झाल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला. आंब्याचे व्यापारी करारास मुकल्‍याने लाखोंची उलाढाल ठप्प झाल्‍याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी

सद्य:स्थितीत आंबा पिकास मोहोर येण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी फळधारणाही झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे करपा आणि तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी औषध फवारणी करावी. तसेच फळधारणा झाल्यावर उपलब्धतेनुसार झाडांना पाणी द्यावे व बुंद्याभोवती आच्छादन करावे, जेणेकरून फळगळती कमी होईल.Weather today

मिळवा आता एका दिवसात दहा लाख.. बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे एवढे वैयक्तिक कर्ज….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top