Blog

Expensive Wheat 2024 : गव्हाची पोळी आपल्या सर्वांची आवडती, येणाऱ्या काळात गहू महागणार..?

Expensive Wheat 2024 यंदा जोरदार पाऊस झाला नाही. पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामालाही पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते.

परंतु नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांनादेखील वेग आला आहे. जिल्ह्यात रख्ची हंगामाचे २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ९८० हेक्टरवर पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.

पाऊस झाला नसला तरी गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख ०८ हजार ९८० हेक्टवर पेरणी झाली आहे.

असे असले तरी गव्हाचा पेरा घटला असून, यंदा केवळ १३ हजार ७३९ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गव्हाच्या किमती वाढणार आहेत.गतवर्षी २४ हजार हेक्टरवर झाला होता पेरागतवर्षी स्वरीप हंगामात जोरदार पाऊस झाला होता.
त्यामुळे रब्बी हंगामासाठी पिकांना पाणी उपलब्ध होते.
गतवर्षी जवळपास २४ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.यंदा मात्र घट झाली आहे.Expensive Wheat 2024गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने पिके वाया गेली.यंदा पाऊस नसल्याने पिके वाया गेली, शेतकरी सतत संकटात सापडत आहे.

तरीही शेतकऱ्यांना मदत पिळत नाही.१३ हजार हेक्टरमध्ये गव्हाचा पेरा जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हाची पेरणी करतात.परंतु यंदा जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पाणीच राहिले नाही.
अवकाळी पाऊस पडल्यामुळे ४८ हजार २०९ हेक्टर क्षेत्रापैकी ९३ हजार ७३९ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.त्यामुळे यंदा गव्हाची मागणी वाढणार असून, भावात मोठी घट होणार असल्याचे सांगण्यात आले.

पीठ महाग का होत आहे? Expensive Wheat 2024

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे भाव वाढले आहेत.
सरकारने यावर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान) प्रत्यक्ष शिपमेंट्स गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत. गव्हाच्या दरात 1 महिन्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एका वर्षात गव्हाच्या दरात 15 टक्के तर पिठाच्या दरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहू शकते. Expensive Wheat 2024नवे पीक एप्रिलमध्ये येईल असं सांगितलं जात आहे. याशिवाय अवेळी झालेल्या पावसामुळे देखील गव्हाचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम देखील पिकावर झाला आहे.
पाऊस न झाल्याने विहिरीमध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकन्यांना गव्हाची पेरणी करता आली नाही.
त्यात अवकाळी पाऊस पडला खरा परंतु, त्याचा गव्हाला फायदा झाला नाही . दुसरीकडे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत होते.

सरकारकडे स्टॉकमध्ये किती गहू Expensive Wheat 2024

सरकारकडील गव्हाचा साठा विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. सरकारकडे २२७ मेट्रिक टन गव्हाचा साठा आहे. बफर स्टॉकपेक्षा केवळ २६ टन जास्त. शेअरची मर्यादा घालण्याचा किंवा खुल्या बाजारात गहू विकण्याचा सरकारचा विचार नाही. गव्हाच्या दरांवर सरकार लक्ष ठेवून आहे. पुढील आठवड्यात आंतर मंत्रालयीन समिती गव्हाच्या दरांचा आढावा घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button