Mahavitaran App महावितरण ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा आणि मिळवा घरबसल्या विजेचे अपडेट.

Mahavitaran Application Download नमस्कार मित्रांनो, कधी पावसाळ्याचेपावसाळ्याचे दिवस सुरू होतात तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच वादळी वारे आणि विजांचा लखलखाट पाहायला मिळतो आणि पाऊस सुरू होत असतो अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी विजेचे खंबे पडणे तसेच विजेच्या तारा पडणे आणि सारखी वीज खंडित होणे बंद होणे यासारख्या बऱ्याचशा समस्या या कालावधीमध्ये घडत असतात अर्थातच पावसाळ्यामध्ये किंवा वारं सुरू असताना या कालावधीमध्ये सर्व घटना घडत असतात.

 

यामुळे बरेचदा अशी परिस्थिती येथे आणि ही परिस्थिती सर्वांसमोर झालेली आहे याबद्दल आपल्याला काहीही करता येत नाही म्हणजेच सर्व गोष्टी पाहिल्या तर आपण आपल्याला कुठलीही या संदर्भात माहिती नसते आणि अपडेट सुद्धा नसते. यामुळे सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या वीज ग्राहकांना कळव्यात या सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी महावितरण अंतर्गत एक तंत्रज्ञानाची मदत म्हणून एक पाऊल पुढे त्यांनी टाकले आहे आणि याचीच एक परिणाम म्हणून महावितरण यांच्या अंतर्गत महावितरण ॲप सुरू करण्यात आली आहे आणि याच ॲपच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळत आहेत.

 

महावितरण ॲप मध्ये बऱ्याच मिळाल्या सुविधा.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की सध्या वादळी वाऱ्याचे दिवस सुरू असून काही दिवसात पंधरा ते वीस दिवसांमध्येच पावसाळा सुरू होणार असून अशा वेळेमध्ये लाईटच्या देखभाल दुरुस्तीची वर्षी कामे केली जातात आणि यामुळे बऱ्याचदा वीज बंद होत असते. तसेच वादळी वारे सुरू असल्यामुळे तारा पडणे आणि विजेचे पोल पडणे यासारख्या समस्या उद्भवतात.

 

पण या सगळ्या गोष्टींचे अपडेट वीस ग्राहकांना कधीही मिळत नाही यासाठीच या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी महावितरण अंतर्गत या ॲपचे लॉन्चिंग करण्यात आलेले आहे. सब स्टेशन आणि स्थानिक परिसरामध्ये जे काही वीज कस्टमर आहेत त्यांना महावितरण अंतर्गत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे आणि वीस पुरवठा सुरू कधी करण्यात येत आहे याबद्दल या एप्लीकेशन वरती सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

 

इतकेच नाही तर मित्रांनो वीज पुरवठा खंडित म्हणजेच बंद होण्याअगोदर वीज ग्राहकांना या एप्लीकेशन वरती सूचना देण्यात येत असतात. या सगळ्यासाठी महावितरण अंतर्गत मेसेजेस सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली होती पण आता दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढलेला असून यासाठी आधुनिक पद्धत सुरू व्हावी याकरिता महावितरण यांच्या अंतर्गत लॉन्चिंग करण्यात आलेली आहे आणि याद्वारे आता अपडेट देण्यात येत आहे.

 

याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर च्या आधारे स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स देण्यात येतील तसेच विज बिल किती आलेले आहे याचे अपडेट सुद्धा यावर आपल्याला नेहमी मिळणार आहे. तसेच याद्वारे आपण मीटर वरील रीडिंग टाकू शकतो आणि जी चालू रीडिंग असते त्या रीडिंग द्वारे आपल्याला विज बिल येणार आहे हा सुद्धा एक फायदा आपल्याला या ॲप्लिकेशन द्वारे होणार आहे. या रीडिंग ला सेल्फ रीडिंग असं सुद्धा म्हणता येईल.

 

अशाप्रकारे करा एप्लीकेशन डाउनलोड.

मित्रांनो तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरील ॲप मध्ये जाऊन आपण सर्च ऑप्शन मध्ये महावितरण असं नाव टाकून सर्च करायचं आहे आणि जे पहिले येणार आहे अर्थातच महावितरण ॲप तुम्हाला दिसणार आहे. त्या ॲप वरती क्लिक करून इन्स्टॉल करायचा आहे. पुढे मोबाईल नंबर टाकून आपला ग्राहक क्रमांक नंबर टाकून तसेच ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथून पुढे सर्व अपडेट दररोज मिळणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top