Market Stock बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाणार आहे. त्यामळे भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत.
जागितक सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने पुरवठा वाढेल, असा अंदाज बाजारात आहे.
त्यामुळे डिसेंबरपासून सोयाबीनचा बाजार दबावात आला आहे. देशातील बाजारातही आवकेचा दबाव कायम आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आवक जास्त Market Stock
आजही बाजारात जवळपास १ लाख ८० हजार क्विंटलची आवक झाली होती. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आवक जास्त आहे. तर सोयाबीनचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारातील कापूस आवक कायम आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून बाजारात दैनंदीन आवक सरासरी १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे. याचा बाजारावर दबाव दिसून येत आहे. आजही कापसाला बाजारात सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
आता तुम्ही ₹ 50,000 ते ₹ 8 लाखांपर्यंतचे Google Pay Loan घरबसल्या सहज मिळवू शकता,
बाजारात सध्या महाराष्ट्रातील आवक जास्त Market Stock
बाजारात सध्या महाराष्ट्रातील आवक जास्त आहे. बाजारातील कापूस आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते,
त्यामुळे दरावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारात लाल मिरचीचे भाव कमी झाले आहेत. बाजारात नवे पीक दाखल होण्यामुळे दरावर दबाव आला.
मिरचीचे भाव क्विंटलमागे जवळपास ५ हजाराने कमी झाले. तसं पाहीलं तर यंदा लाल मिरचीचे पीक कमी आहे. देशभरातील शेतकरी याची पुष्टी करत आहेत.
ढगाळ वातावरणाचा फटका..! घ्या या वातावरणात आपल्या फळबागांची काळजी..
लाल मिरचीचे भाव
पण बाजारात आवक वाढणार या शक्यतेमुळे आणि मागणी कमी असल्यामुळे लाल मिरचीचे भाव कमी झाले.
सध्या लाल मिरचीला १८ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाणार आहे.
त्यामळे भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज आहे.
लसूण बाजारातील तेजी कायम आहे. लसूण आजही बाजारात सध्या चांगलाच भाव खात आहे.
लसणाची बाजारातील आवक कमी असल्याने बाजाराला चांगला आधार मिळत आहे. सणाला सध्या लग्न समारंभ आणि हाॅटेल क्षेत्रातून चांगली मागणी येत आहे.Market Stock
मिळवा आता एका दिवसात दहा लाख.. बँक ऑफ महाराष्ट्र देत आहे
लसणाचे भाव तेजीत
त्यामुळेही लसणाचे भाव तेजीत आले. सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत. यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून, लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
जिऱ्याचा बाजार नरमल्यानंतर मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. Market Stock जिऱ्याचे भाव मात्र दीड महिन्यात जवळपास निम्म्यावर आले. जिऱ्याचे मार्चचे वायदे २६ हजार १७६ रुपयांवर आले आहेत. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ३२ हजार ते ३३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे.
जिऱ्याची लागवड वाढल्यामुळे बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. महत्वाच्या गुजरात आणि राजस्थानमध्ये जिऱ्याचे उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने भाव नरमले आहेत. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे.