Crop Insurance नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात करणारे नुकसान आणि या नुकसान भरपाईचा विचार करता महाराष्ट्र शासन अंतर्गत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांच्या पिकांना सर्व पद्धतीने संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजना लागू केली आहे अर्थातच सर्व जिल्ह्यांसाठी सर्व राज्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील 13 जिल्ह्यांची निवड केलेली आहे आणि यामधील गावांमधील शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम मिळणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल रक्कम.
या योजनेच्या अंतर्गत निवडून घेतलेल्या गावांमधील सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून या योजनेचा फायदा शेतकरी बांधवांना घेण्यासाठी कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही. जर पिकांचे नुकसान झाले आहे तर शेतकऱ्यांना दिलेल्या विम्याची जी रक्कम आहे या मधून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय.
या योजनेचा महाराष्ट्र सरकारने मागील आठवड्यामध्ये एक शासन निर्णय जाहीर केला होता या शासन निर्णयाप्रमाणे शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांपर्यंत ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल असे सुद्धा शासनाकडून सांगण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे मिळाला प्रतिसाद.
या योजनेमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे तसेच पिकांचे नुकसान झाले जरी असले तरी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही आणि आता शेतकरी बांधव निर्धारस्थपणे शेती करू शकतील यामुळेच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी बांधवांचा हिताचा असल्यामुळे शेतकरी बांधवांना मध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. मित्रांनो खाली दिलेल्या सर्व जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.
निवडलेल्या 13 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे.
नागपूर जिल्हा
अमरावती जिल्हा
बुलढाणा जिल्हा
अकोला जिल्हा
यवतमाळ जिल्हा
वाशिम जिल्हा
परभणी जिल्हा
हिंगोली जिल्हा
नांदेड जिल्हा
बीड जिल्हा
लातूर जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
छत्रपती संभाजीनगर
या तेरा जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेची रक्कम मिळणार आहे आणि त्यांना नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.