Driving Licence नमस्कार मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अगोदर आपल्याला आरटीओ ला जावे लागत होते पण मित्रांनो आता नवीन निमंत्र म्हणे आपण आरटीओ मध्ये जाऊन सुद्धा लायसन काढू शकतो आणि खाजगी संस्था ज्या आहेत ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडून सुद्धा आपण आता ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊ शकतो. याचाच अर्थ असा की आपण ड्रायव्हिंग लायसन्स साठी आता खाजगी संस्थेमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो आणि त्यांच्याकडून ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतो. मित्रांनो हे नियम कशा पद्धतीचे आहेत हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा पासून ते वाहन चालवण्याची चाचणी सुद्धा द्यावी लागते हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण आता सगळ्या प्रक्रियेमध्ये आठवडा नक्कीच जातो आणि आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेमधून सुटका सुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी घेण्याची सुद्धा आता गरज पडणार नाही. खाजगी संस्थांना चाचण्या घेण्याचे आणि प्रमाणपत्र देण्याची सांगण्यात आलेली आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल मोठे व्यक्त केले आहे आणि यामध्ये नियमात बदल सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि एक जून पासून लागू होणार असून नव्या नियमाप्रमाणे वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने आपण गाडी चालवली तर आपल्याला एक ते दोन हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार आहे. तसेच कुठल्या अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पोलिसांनी धरला तर त्याला 25000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो इतकेच नाही तर ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा कॅन्सल केले जाईल. या नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येत नाही.
याबद्दलच खाजगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे ड्रायव्हिंग लायसन्स संस्था घेण्यासाठी कमीत कमी एक एकर जमीन असायला हवी. तसेच मोटार वाहन चालन प्रशिक्षण केंद्र संस्थांचे असेल तर आपल्याला दोन एकर जमीन असायला हवी या सोबतच आपल्याला वाहन चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे सर्व असायला हव्यात. शिक्षण केंद्राकडे आणि प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा कोर्स असणे गरजेचे आहे आणि त्याच्याकडे कमीत कमी पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा तरच आपण खाजगी संस्था सुरू करू शकतो आणि अशा पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा वितरित करू शकतो किंवा ड्राइविंग लायसन्स चाचणी घेऊ शकतो. तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याबद्दल नियम लागू झालेले आहेत आणि ड्रायव्हिंग लायसन्स खाजगी संस्था तुम्हाला घ्यायची असेल तर सुद्धा आपण जे नियम आहे ते सुद्धा सांगितलेले आहेत आणि हे सर्व नियम एक जून पासून लागू होणार आहेत.