Blog

Goat Farming Loan

Goat Farming Loan शेळीपालन कर्जाचा उपयोग जमीन खरेदी, शेड बांधणे, शेळ्या खरेदी करणे, चारा खरेदी करणे इत्यादी कारणांसाठी केला जाऊ शकतो. सरकारने विविध नवीन योजना सुरू केल्या आहेत आणि शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांसाठी अनुदाने सुरू केली आहेत.

शेतकऱ्याने अशी बँक उभी केली आहे. जिचे नाव ऐकून तुम्हीही काही वेळ विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. या शेतकऱ्याने उभारलेल्या आपल्या बँकेला गोट बँक असे नाव दिले असून, या बँकेच्या माध्यमातून पैसे नाही तर कर्जस्वरूपात शेळ्या व्याजाने दिल्या जातात. “गोट बँक ऑफ कारखेडा” नावाने सुरु झालेल्या या बँकेत कोणताही पैशांचा व्यवहार होत नाही. तर कर्ज स्वरूपात शेळ्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याऐवजी व्याज स्वरूपात प्रत्येक शेळीपासून जन्मलेल्या चार शेळीची बकरे वापस घेतल्या जातात.

नरेश देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते आपला शेळ्या व्याजाने देण्याचा व्यवसाय गेल्या ५ वर्षांपासून करत आहे. त्यांच्या या व्यवसायाची कलपना पाहून तुम्हीही विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळ्या व्याजाने देताना ११०० रुपये बॉण्ड करून जमा केले जातात. व्यवहारात पारदर्शकता असावी म्हणून हे पैसे जमा केले जातात. व्यवहार झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक गाभण शेळी दिली जाते. झालेल्या व्यवहारानुसार पुढील ४० महिन्यांच्या कालावधीत संबधित शेतकऱ्यांना त्या शेळीपासून जन्मलेली ४ बकरे बँकेला वापस करावी लागतात.

दरम्यान, या आगळ्यावेगळ्या बँकेच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत असून, शेळीपालनाचा व्यवसाय देखील वृद्धिंगत होत आहे. आज बाजारात शेळीची किंमत ही १० ते ११ हजारांच्या कमी नसते. मात्र या बँकेच्या माध्यमातून गरजूंना फक्त ११०० रुपयांचा बॉण्ड करून ही १० ते शेतकरी ग्रुप जॉन करा गाभण शेळी उपलब्ध करून दिली जाते. एक बकरी वर्षभरात दोन वेळा पिल्लांना जन्म देते. तर या बँकेच्या या योजनेतून ४० महिन्यांच्या कालावधीत शेळीच्या बदल्यात ४ शेळ्या बँकेला परत कराव्या लागतात.

बँकेची वैशिष्ट्ये Goat Farming Loan

  • 1100 रूपयांच्या करारात गरजूंना व्यवसायासाठी शेळी मिळते.
  • ग्रामप्रेरकाच्या माध्यमातून होतो करार.
  • 40 महिन्यांत चार बकऱ्या बँकेला परत करणे बंधनकारक.
  • बँक लसीकरण, खाद्य आणि रोग प्रतिबंधक सल्ला पुरविते.
  • बँकेची नवी शाखा उघडण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांची आवश्यकता.
  • शाखेसाठी अडीच एकरांत बकरीच्या पशुखाद्यासाठी जंगली वनस्पतींची लागवड आवश्यक.
  • बँकेत बकरीच्या स्वरूपातच कर्ज, व्याज, परतफेड, डिपॉझिटची व्यवस्था.
  • सात ते आठ महिन्यांच्या शेळी झाल्यावर विक्रीतून नफा मिळू शकतो.
  • ११०० रुपयात संगोपनासाठी मदत

बँकेने जमा केलेल्या ११०० रुपये या रजिस्ट्रेशन फीमध्ये गरजू शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय मदत आणि पशुलसींच्या माध्यमातून आरोग्य, खाद्य आणि लसीकरण विषयक सल्ल्याची व्यवस्था करण्यात कोणत्याही Goat Farming Loan अडचणींचा सामना करावा लागत नाही. याशिवाय या अकराशे रुपयांमध्ये शेळ्यांचा विमा देखील काढला जातो. त्यामुळे शेळी दगावल्यास लाभार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता नसते.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज अर्जदाराची केवायसी कागदपत्रे,
  • जसे की ओळख,
  • वय आणि पत्त्याचे पुरावे अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे बीपीएल कार्ड,
  • उपलब्ध असल्यास जात प्रमाणपत्र,
  • SC/ST किंवा OBC प्रवर्गातील असल्यास मागील 6 महिन्यांच्या बँक स्टेटमेंटसह उत्पन्नाचा पुरावा व्यवसाय स्थापनेचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र Goat Farming Loan
  • मूळ जमीन नोंदणी कागदपत्रे सावकाराला आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button