Mahila Samman Yojana नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यांमध्ये महिलांसाठी शासनाकडून वेगवेगळे योजना राबवल्या जात आहेत आणि अशा मध्येच दिल्ली सरकार अंतर्गत महिला सन्मान योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. याचे कारण असे की मध्य प्रदेशांमध्ये लाडली बहन योजना आणि छत्तीसगडमध्ये मात्र वंदन योजना सुरू केलेल्या असून यामध्ये महिला सन्मान योजना दिल्ली राज्यातील सगळ्या महिलांना देण्यात यावी अशी घोषणा करण्यात आलेली आहे.
महिलांना एक हजार रुपये देण्याचे उद्दिष्ट सध्या सरकारचे असून महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्यांमधील महिलांना जवळपास एक हजार रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांचे ऑनलाईन अर्ज शासनाकडून घेतले जाणार आहेत तसेच अर्जासाठी असलेली सर्व डॉक्युमेंट्स पात्रता ही सर्व माहिती पुढील आम्ही आपल्या लेखांमध्ये देत आहोत.
महिला सन्मान योजनेसाठी ही असेल पात्रता.
1) जर आपल्याला महिला सन्मान योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे तर ही योजना फक्त दिल्ली सरकारद्वारे सध्या सुरू आहे. लवकरच योजना महाराष्ट्रात देखील सुरू होणार आहे.
2) अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असावी तसेच जास्तीत जास्त वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
3) महिलेच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य आयटीआर फाईल भरणारा नसावा किंवा सरकारी नोकर नसावा.
4) योजनेची सर्व आवश्यक कागदपत्रे असावेत आणि या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग महिलांना पात्र मानले जाणार आहे.
महिला सन्मान योजना आवश्यक डॉक्युमेंट्स.
आधार कार्ड
राशन कार्ड
बँक पासबुक
रहिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो