Blog

Urea Rate 2024:मोदी सरकारचे मापात पाप, युरियाचे दर जैसे थे परंतु वजनात केली कपात

Urea Rate 2024 रासायनिक खतांचे दर भरमसाठ केले आता युरिया कमी केल्याने शेतकऱ्याला अस्मानी बरोबर सुलतानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मोदी सरकारने रासायनिक खतांचे अनुदान देण्याचे बंद केले आहे. यामुळे अनुदान काढून घेतल्यानंतर मिश्र खतांचे दर भरमसाठ वाढल्याने एकरी खर्चात वाढ झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मिळणारे सर्वात स्वस्त रासायनीक खत म्हणजे युरिया होते परंतु या युरियाच्या वजनात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युरियाचे ४५ किलोचे मिळणारे पोते आता ४० किलोमध्ये

सध्या युरियाचे ४५ किलोचे मिळणारे पोते आता ४० किलोमध्ये मिळणार आहे. दर तोच ठेवला असला तरी मापात पाप करून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. रासायनिक खतांचे दर भरमसाठ केले आता युरिया कमी केल्याने शेतकऱ्याला अस्मानी बरोबर सुलतानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

युरिया ४० किलोच्या वजनात उपलब्द

२०१४ च्या दरम्यान युरिया ५० किलोचे पोते २६६ रुपये ५० पैशांना मिळत होता. Urea Rate 2024 यानंतर पुढच्या काही काळात दर तोच ठेवून वजन ४५ किलो करण्यात आले. यानंतर आता सल्फर कोटेड युरिया ४० किलोच्या वजनात उपलब्द होणार आहे. या सरकारने पोत्याचे वजन कमी केले परंतु युरियाचे दर तेच ठेवले आहेत. परंतु मागच्या काही वर्षातील दराचा विचार केला तर २४ टक्क्यांची वाढ केली आहे.

रासायनिक खतांना भरघोस अनुदान Urea Rate 2024

तत्कालीन काँग्रेस सरकारने दहा वर्षांपूर्वी रासायनिक खतांना भरघोस अनुदान देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध झाल्याने उत्पादन खर्चात बचत व्हायची. पण, अलीकडे केंद्र सरकारने रासायनिक खते नियंत्रणमुक्त करून त्याचे दर ठरवण्याचे अधिकार खत कंपन्यांना दिले. त्यामुळे खत कंपन्यांची मनमानी सुरू झाली असून खतांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थीक घट होऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

यावर शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. एकीकडे उसाचे उत्पादन घटले आहे, दुसऱ्या बाजूला रासायिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्याने इतर पिकांचे उत्पादनही घटणार आहे. केंद्र सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे, हेच कळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून याचा विरोध करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

युरियात मिळणारे घटक Urea Rate 2024

युरियात १७% सल्फर यापूर्वी युरियामध्ये ४६ टक्के नत्राचे प्रमाण होते. आता नवीन पॅकिंगमध्ये ३७ टक्के नत्र व १७ टक्के सल्फर (गंधक) चे प्रमाण राहणार आहे. हा युरिया पिकांना गरजेनुसार हळूहळू मिळू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button