government scheme

PM Kisan शेतकऱ्यांसाठी खुशखबर.!! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता या दिवशी होणार अकाउंट मध्ये जमा.

PM Kisan Yojana नमस्कार मित्रांनो सध्या दुष्काळ अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे तसेच हातात तोंडाशी आलेले जे पीक आहे ते सुद्धा नैसर्गिक संकटामुळे हिरावून घेतलं जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणींमध्ये आलेले असून सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच बांधणीमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत तीच म्हणजे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे कधी जमा होणार आहेत.? हेच आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

 

या दिवशी जमा होणार 17 व्या हप्त्याचे पैसे

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हस्तांतरित केलं जाणार आहेत असं सूत्रांच्या माहिती द्वारे समजत आहे. पण 17 हप्त्याचे पैसे अकाउंट मध्ये टाकण्याबाबत ज्या अधिकृत तारखा आहेत या अधिकृत तारखांची कोणतीही घोषणा शासनाकडून केलेली नाही. आपल्या देशातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार अंतर्गत काही वर्षांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

 

तसेच या योजनेच्या मदतीने सरकार दरवर्षी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा पद्धतीने वर्षातून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेती साहित्य घेण्यासाठी करत असते. आणि आतापर्यंत केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 16 हप्ते हस्तांतरित केलेले आहेत आणि केंद्र सरकार अंतर्गत लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 17 वा हप्ता सुद्धा आता टाकण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये पेरणीचे दिवस असतात आणि यामुळे शेतकरी बांधवांना खते औषधे बी बियाणे घेण्यासाठी पैशांची गरज लागते हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकार लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये टाकणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button