पोल्ट्री फार्ममध्ये काय आहे?
Poultry Farming कुक्कुटपालन म्हणजे पाळीव पक्षी पाळले जातात . पोल्ट्रीमध्ये कोंबडी, टर्की, बदके आणि गुसचे अ.व. हे प्राणी त्यांच्या मांस आणि अंडीसाठी वाढवले जातात.
पोल्ट्री फार्मची महत्त्वाची गरज काय आहे?
त्यात पाणी, वीज या मूलभूत सुविधा असाव्यात . तुलनेने कमी मजुरीवर शेतमजुरांची उपलब्धता. कुक्कुटपालन घर उंच भागात असावे आणि तेथे पाणी साचू नये. त्यात योग्य वायुवीजन असावे.
शेतकरी नियोजन – कुक्कुटपालन Poultry Farming
शेतीसाठी पाण्याची टंचाई असल्याने शेतीपूरक व्यवसाय करण्याचे राजेंद्र मगर यांनी ठरविले. त्यासाठी परिसरातील कुकुटपालन करणाऱ्या अनुभवी लोकांकडून माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत व्यवसायास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पक्षिक्षमता कमी होती.
मात्र टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करत गेले. सध्या त्यांच्याकडे एकूण तीन पक्षिगृह असून त्यात सुमारे १२ हजार पक्ष्यांचे संगोपन ते करत आहेत. मागील २४ वर्षांपासून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात सातत्य राखले आहे.
आता तुम्ही ₹ 50,000 ते ₹ 8 लाखांपर्यंतचे Google Pay Loan घरबसल्या सहज मिळवू शकता,
बॅच नियोजन : Poultry Farming
नवीन बॅच सुरु करण्यापूर्वी पक्षिगृहाची स्वच्छता व निर्जंतुक केले जाते. जेणेकरून नवीन बॅचमधील पक्ष्यांना आजाराची बाधा होणार नाही.त्यानंतर बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरले जाते.पिल्ले शेडवर आणण्यापूर्वी खाद्य व पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.पिल्लांच्या संख्येनुसार खाद्य व पिण्याची भांडी यांची संख्या ठरविली जाते.साधारण १ दिवस वयाची पिल्लांची खरेदी केली जाते.
त्यानंतर चार ते पाच दिवस ब्रुडिंग करून विशेष लक्ष दिले जाते.पक्ष्यांना वाढीच्या अवस्थेनुसार खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. शास्त्रीय पद्धतीने संगोपन आणि व्यवस्थापन ह्या बाबी व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार औषधांच्या मात्रा दिल्या जातात.
जनावरांचे शेड बांधण्यासाठी 1 लाख 60 हजार अनुदान मिळणार, असे करा अर्ज
गुणवत्तापूर्ण खाद्य पुरवठा :
ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीसाठी संतुलित आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जेणेकरून त्यांचे अपेक्षित वजन भरेल. त्यानुसार पक्ष्यांच्या वयानुसार खाद्य पुरवठा करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले जाते. खाद्यामध्ये सोया, मका यांचा संतुलित प्रमाणात वापर केला जातो. त्यात आवश्यक पूरक घटकांचे मिश्रण करून खाद्य तयार केले जाते. संपूर्ण खाद्य शेडवरच तयार केले जाते. त्यामुळे खाद्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यास मदत होते. दर्जेदार आणि उत्तम प्रतीच्या खाद्याचा पुरवठा केल्यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे पक्षी रोगाला बळी पडून होणारी मरतूक टाळली जाते. Poultry Farming
लाल मिरचीच्या भावावर दबाव?बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाणार,त्यामळे भावावरील दबाव कायम
व्यवस्थापनातील बाबी :
वर्षभरात साधारण पाच बॅच घेतल्या जातात. एक बॅच साधारण ४० ते ४८ दिवसांची असते.बदलत्या हवामानानुसार पक्षिगृहातील व्यवस्थापनात बदल केला जातो.स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वातावरणीय बदलांनुसार योग्य नियोजन केले जाते.खाद्य व्यवस्थापनात विशेष भर दिला जातो.बाजाराच्या मागणीनुसार प्रत्येक बॅचचे नियोजन करून त्यानुसार विक्री नियोजन केले जाते.
ढगाळ वातावरणाचा फटका..! घ्या या वातावरणात आपल्या फळबागांची काळजी..
पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे?
याचा अर्थ जर तुम्ही लहान प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सुमारे 50,000 ते 1,50,000 रुपये लागतील. मध्यम स्तरावरील पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 1.5 लाख ते 3.5 लाख रुपयांची आवश्यकता असू शकते. आणि मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्मसाठी, तुम्हाला सुमारे INR 7 लाख ते INR 10 लाख गुंतवणूक करावी लागेल. Poultry Farming