Central Government Purchase Market Price तुरीचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट, आयातीसाठी मुक्त धोरण राबविणाऱ्या केंद्र सरकारने यंदा शेतकऱ्यांकडून हमीभावाने नाही तर बाजारभावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण यंदा देशातील उत्पादन कमी असल्याने सरकार एका विशिष्ट काळातच तुरीचे भाव दबावात ठेवू शकेल, असे अभ्यासकांनी सांगितले. दरम्यान, सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर ऐन निवडणुकांच्या काळात ग्राहकांना स्वस्त तूर देण्यासाठी घेतला असल्याचे बोलले जात आहे.
तुरीचे भाव हमीभावापेक्षा जास्तच
बाजारात सध्या तुरीचे भाव हमीभावापेक्षा जास्तच आहेत.
पण कापूस, सोयाबीन, मूग, मका, कांदा, टोमॅटो, गहू या पिकांचे भाव कमी आहेत.
दुष्काळामुळे आर्थिक चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर सरकार निवडणुकांमुळे शेतीमालाचे भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.Central Government Purchase Market Price
त्यामुळेच सरकार केवळ तुरीचीच खरेदी बाजारभावाने करणार आहे.
याचे महत्त्वाचे कारण निवडणुका आणि तुरीच्या भावात असलेली तेजी.
कांदा, टोमॅटो, गहू, तांदूळ, मका, मूग, हरभरा या शेतीमालाचे भाव सरकारच्या धोरणामुळेच कमी झाले आहेत.
पण तुरीचे भाव कमी झाले नाहीत. देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादा, ही प्रमुख कारणे त्यामागे होती.
हरभऱ्याप्रमाणे जर तुरीचा स्टॉक असता तर तो कमी भावात बाजारात आणून भाव कमी करता आले असते.
पण मागील हंगामात खरेदी केली नसल्याने सरकारकडे तुरीचा स्टॉक नाही. त्यामुळेच यंदा सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार किती खरेदी करणार? Central Government Purchase Market Price
केंद्र सरकार किती तूर खरेदी करणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
पण सरकारला तूर बाजारात हस्तक्षेप करून हरभऱ्याप्रमाणे तुरीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी १० लाख टनांच्या दरम्यान खरेदी करावी लागेल,
असे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. केंद्रीय सहकार विभागाने काही दिवसांपूर्वी,
सरकार ८ ते १० लाख टन तूर खेरदी करू शकते, असे सांगितले होते. पण सरकारने अद्याप अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.
‘नाफेड’ रोज भाव जाहीर करणार
सरकारसाठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून बाजारभावाने तूर खेरदी करण्यात येणार आहे. यंदा हमीभाव ७ हजार रुपये आहे. पण यंदा ‘नाफेड’कडून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव नाही तर बाजारभाव मिळेल. खुल्या बाजाराचा आढावा घेऊन नाफेडकडून रोज त्यांचे भाव जाहीर करण्यात येणार आहेत आणि तो भाव शेतकऱ्यांच्या तुरीला देण्यात येणार आहे.
-सरकार निवडणुका होईपर्यंत जास्त तूर विकू शकते
– बाजारातील तूर आवक मार्चपर्यंत जास्त राहू शकते
– मार्च-एप्रिलनंतर तूर आवक कमी होत जाईल
– आवक कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा शक्य Central Government Purchase Market Price